लष्कराने केले तीन दहशतवाद्यांचे स्केच जाहीर

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात १६ जुलै रोजी दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये एक कॅप्टन आणि इतर तीन लष्करी जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी ‘काश्मीर टायगर्स’ या पाकिस्तान समर्थन दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या छाया गटाने घेतली होती. डोडा उरारी बागी भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारादरम्यान ही घटना घडली. या गोळीबारात दोन जवानही जखमी झाले आहे.
सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोध मोहीम राबवत आहे
अलिकडच्या काही महिन्यांत जम्मू भागात घडलेल्या अनेक दहशतवादी घटनांपैकी डोडा येथील दहशतवादी हल्ला हा एक होता. 2024 च्या सुरुवातीपासून, जम्मू प्रांतातील सहा जिल्ह्यांमध्ये सुमारे डझनभर दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवादी मारले गेले आहेत. इतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबवली जात आहे.
कुपवाडा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक
जम्मू आणि काश्मीर प्रदेशात दहशतवादाचा सततचा धोका हा भारत सरकारसाठी सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. शनिवारीच कुपवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एक जवान शहीद झाला असून एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले आहेत. जवानांनी एका दहशतवाद्यालाही ठार केले. वा हा पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमचा एक भाग होता, ज्यात पाकिस्तानी लष्कराचे कमांडो आणि दहशतवादी आहेत.





