क्षणात होणार होता सर्वनाश.! गॅस स्फोटातून पती-पत्नीची थरारक सुटका; Video एकदा पाहाच…

Gas cylinder leak : एलपीजी सिलिंडर स्फोटाच्या अनेक भयानक घटना घडल्या आहेत ज्यात लोकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे लोकांना दर आठवड्याला किंवा दहा दिवसांनी गॅस सिलिंडर वापरण्यापूर्वी तपासण्याचा सल्ला दिला जातो. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये सिलिंडरच्या रेग्युलेटर क्षेत्रात गॅस गळती आणि आग कशी नियंत्रित करायची हे सांगितले जाते.
परंतु सिलिंडरला आग लागल्यावर लोक घाबरतात आणि आग विझवण्याऐवजी घराबाहेर पडतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा विडिओ सोशल मीडियावर खूपच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
They were fortunate that all doors and windows were open, allowing much of the gas to escape outdoors, significantly reducing the explosion’s impact.
pic.twitter.com/fFnDIlHk5F— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 22, 2025
या व्हिडिओमध्ये एका घरात गळणाऱ्या गॅस सिलिंडरला हाताळताना एक महिला दिसत आहे. सिलिंडरच्या पाईपमधून गॅस वेगाने गळू लागल्यावर, ती महिला सिलिंडर घरात सोडून पळून गेली. हळूहळू सर्व गॅस पाईपमधून सिलिंडरमधून बाहेर पडला आणि शेवटी सिलिंडर रिकामा झाला.
यानंतर, पती-पत्नी घरात आले आणि स्वयंपाकघराबाहेर पडलेल्या सिलिंडरचा रेग्युलेटर बंद करणारच होते, तेव्हा स्वयंपाकघरातून संपूर्ण घरात पसरलेल्या गॅसने आग पकडली आणि आगीच्या लोटात रूपांतरित झाले. सुदैवाने, या प्राणघातक अपघातात पती-पत्नी दोघेही सुखरूप बचावले.
या घटनेनंतर अनेकांनी सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अनेकांनी गॅस स्टोव्ह वापरल्यानंतर रेग्युलेटर बंद करावा असे म्हटले आहे. त्याच वेळी, एकाने लिहिले आहे, ‘देवाचे आभार की दोघेही सुरक्षित आहेत’. दुसऱ्याने लिहिले आहे, ‘जर महिलेने आधी रेग्युलेटर बंद केला असता तर ही दुर्घटना घडली नसती’. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर नेटकरी करत आहेत.





