भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Pune News: आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘अतुल्य भारत’ हा विषय घेऊन संपन्न झाला. या कार्यक्रमात पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. काश्मीर ते कन्याकुमारी सर्व राज्यांची माहिती लहान मुलांनी नृत्याद्वारे सादर केली. यावेळी अगदी दोन वर्षापासूनच्या विद्यार्थ्यांचा या नृत्य कार्यक्रमात सहभाग होता.
स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि 21व्या तकातला भारत यामध्ये किती अमुलाग्र बदल झाला आहे, याचे दर्शन विद्यार्थ्यांनी आपल्या नाटक आणि नृत्यद्वारे घडविले. यावेळी अगदी पूर्वापार चालत आलेली शेतीची पद्धत आणि आजची आधुनिक विकसित शेती पद्धत कशी आहे? शिक्षण क्षेत्र अगदी गुरुकुल पद्धतीपासून तर आजच्या डिजिटल शिक्षण पद्धती कशी आहे, हे मुलांनी नाटक आणि नृत्यद्वारे दाखवून दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतला भारत कसा असेल याचे दर्शन या मुलांनी नृत्यद्वारे सादर केले. आज आपला भारत देश जगाच्या पाठीवर प्रगल्भ देश म्हणून विकसित देश म्हणून पुढे येत आहे. यामध्ये टुरिझम क्षेत्र असू देत की खेळामध्ये देखील पूर्वीच्या काळी अगदी लिंगोरच्या, कबड्डी, खो-खो ते आजच्या क्रिकेट, फुटबॉल, हॉकी असू देत या सगळ्यांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी सुंदर रित्या सादर केले.
भारत वैद्यकीय क्षेत्रात अतिशय प्रगत देश आहे. आयुर्वेदापासून ते आजच्या अॅलोपेथीपर्यंत भारताने औषध निर्मितीमध्ये तसेच कित्येक आजारांवर कशा पद्धतीने मात केली याचे प्रदर्शन देखील मुलांनी सादर केले. यामध्ये कोविड काळामध्ये आयुर्वेदाचा कसा उपयोग झाला आणि नरेंद्र मोदी यांनी लोकांना जो शांततेचा संदेश दिला हा देखील मुलांच्या नृत्यद्वारे सादर झाला. चंद्रयान, मंगलयान मोहीमेचे सादरीकरण विद्यार्थ्याने सादर केले.
आज शिक्षण क्षेत्रामध्ये पुरुषांनी इतक्याच महिला देखील कार्यरत आहे. उत्तम प्रतीचे शिक्षण घेऊन महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत आणि याचे प्रदर्शन पुरुष आणि स्त्री हे सर्व क्षेत्रांमध्ये बरोबरीने कशा पद्धतीने काम करतात याचे प्रदर्शन देखील विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यद्वारे दाखवून दिले.
यावेळी आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलचे 25 विद्यार्थी ज्यांची आयआयटीसाठी निवड झाली आहे, अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्युनिअर कॉलेजच्या आयआयटीमध्ये निवड झालेल्या सात विद्यार्थ्यांचे, वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झालेले दहा विद्यार्थी, त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय तसेच राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले अशा विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
दहावी आणि बारावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले आहे ,अशा विद्यार्थ्यांचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार देखील पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जालन्याची आमदार अजून खोतकर, महाराष्ट्र एचएससी बोर्डच्या संचालक अनुराधा ओक, जालन्याचे प्रसिद्ध वकील हरिभाऊ जोल आदेसाहेब, आरटीओ कमिशनर वसई, नील प्रसाद चव्हाण साहेब डेप्युटी डायरेक्टर बारामती, एचएससी बोर्डाचे चेअरमन गोसावी साहेब उपस्थित होते. तृतीय सत्रामध्ये मुळशीचे आमदार शंकरशेठ मांडेकर, उद्योजक सुशील अग्रवाल उपस्थित होते. यावेळी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवलाल नाना धनकुडे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सांगता संस्थेचे खजिनदार राहुल धनकुडे यांनी सर्वांचे आभार मानून केली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंत्री महोदय सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील आभार राहुल धनकुडे यांनी मानले.





