मोरगावचा जिरायती भाग होणार जलमय, सीएसआर फंडातून 1.32 कोटीचा निधी

मोरगाव – येथील जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व आदर पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांचे सहकार्यातुन पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये जोगवडी ते खटकळ ओढा, ढोलेमळा, मोरगाव येथील शेतीला पाणी पुरवठा जलवाहिनीसाठी 8 मार्च 22 रोजी सीएसआर फंडातून 1.32 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेमुळे अंदाजे 450 ते 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच अंदाजे 150 से 200 शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचवणार आहे.
या कामासाठी मोरगाव येथील शेतकरी अनिल ढोले, चांगदेव ढोले, अविनाश ढोले, हनुमंत ढोले, अंकुश ढोले, विठ्ठल ढोले, त्रिंबक खोपडे, सखाराम तावरे, नारायण तावरे, विलास तावरे, महादेव ढोले, अभिजीत ढोले, मोरगावचे सरपंच नीलेश केदारी, माजी सरपंच पोपट तावरे व ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.
या योजनेमुळे मोरगाव परिसरातील ढोलेमळा, पाटील बुवाचा मळा, चोपणवस्ती, तावरेवस्ती, हनुमाननगर सोनारशेत येथील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सदर योजनेकामी महापालिका उपायुक्त संदीप कदम यांनी समन्वय साधून योजना पूर्ण करणेसाठी विशेष योगदान व सहकार्य केले. या योजनेचे काम येत्या एक दोन दिवसांत सुरू होणार आहे. दीड ते दोन महिन्यात संपूर्ण काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या योजनेमुळे मोरगाव व परिसरातील वाडीवस्तीवरील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुंबई येथे जाऊन सत्कार केला. तसेच सिंचन विभागातील मुख्य अभियंता गुणाले यांचेही आभार मानले.





