‘इथे’ गुगल मॅपवर बंदी! प्रशासनाने दिला न वापरण्याचा सल्ला, ‘हे’ आहे कारण

तुम्ही गुगल मॅपबद्दल खूप ऐकले असेल. आजच्या काळात, बहुतेक लोक केवळ गुगल मॅपमुळे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतात. कधी कधी मार्ग चुकला तर गुगल मॅप खूप प्रभावी ठरतो. पण आज आम्ही तुम्हाला गुगल मॅपशी निगडीत अशाच बातम्यांबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून घेऊन तुम्ही हैराण व्हाल. आज आम्ही एका अशा गावाविषयी सांगत आहोत जे पर्यटकांसाठी गुगल मॅप एक डोकेदुखी बनले आहे.
इटलीतील सार्डिनिया गावात येथील महापौर पर्यटकांना गुगल मॅप न वापरण्याचा सल्ला देत आहेत. होय, तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे.
ओग्लिस्ट्रा प्रांतातील बौनाई या डोंगराळ गावाचे महापौर साल्वाटोर कोरेअस यांनी लोकांना कागदाचे पारंपारिक नकाशे वापरण्याचा सल्ला दिला. कारण बरेच पर्यटक गुगल मॅपचा वापर करून भरकटतात आणि धोकादायक ठिकाणी जातात, ज्यामुळे अग्निशमन सेवा किंवा माउंटन रेस्क्यू टीमला वारंवार कॉल केले जातात. रेस्क्यू टीमला यावे लागते व पर्यटकांना शोधण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा वेळेवर मदत न मिळाल्याने प्रवाशांना आपले प्राण गमावण्यचाही धोका उद्भवत असतो.
त्यामुळेच येथील स्थानिक पोलिसांनी नागरिकांना गुगल मॅपने सुचविलेल्या सूचनांचे पालन करू नका, असा संदेश दिला. येथील प्रशासनाने सांगितले की, आम्ही लोकांना कागदी नकाशे देऊ आणि योग्य नकाशा सोशल मीडियावर शेअर करू, जेणेकरून लोकांच्या त्रासापासून वाचता येईल.




