Cabinet Expansion : ज्याला भरसभेत मंत्रीपदाचा शब्द दिला त्याच आमदाराचा एकनाथ शिंदेकडून पत्ता कट

मुंबई : रविवारी नागपूरमध्ये महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या मंत्रीमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण यांचा समावेश आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली.
‘या’ नेत्याला भरसभेत दिला होता शब्द
तानाजी सावंत यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघात प्रचार सभा घेतली होती. या प्रचार सभेत तानाजी सावंत यांना शिंदेंनी मंत्रिपदाचा शब्द दिला होता. तानाजी सावंत यांना मंत्रिपदाचं आश्वासन दिलं होतं. ‘तानाजीरावांना तुम्ही आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी’ असं एकनाथ शिंदे यांनी भरसभेत म्हटलं होतं. मात्र आता तानाजी सावंत यांचं मंत्रिपद हुकलं आहे.
‘या’ नेत्यांचा पत्ता कट
रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिवसेनेकडून दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि विजय शिवतारे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता अनेक नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.





