वाघोलीतील वाहतूक कोंडी उपाययोजनांबाबत अपर पोलीस आयुक्तांनी घेतला आढावा
Updated On:

वाघोली : वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकचा अवलंब करून पुणे-नगर रोड तसेच महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण कारवाई केल्यानंतर पुढील उपाययोजनांबाबत अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील व आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी शुक्रवारी (दि.७) आढावा घेतला.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढील काही दिवसांमध्ये संबंधित विभागांबरोबर काम करून रस्ता रुंदीकरण, सिग्नल व्यवस्थापन, चौक रुंदीकरण व विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस, पीडब्लूडी, पीएमसी, महावितरण व संबंधित विभागाचे अधिकारी, वाघोलीतील नागरिक उपस्थित होते.





