‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्री झळकणार हिंदी सीरिजमध्ये

Actor Dnyanada Ramtirthkar | मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हिंदी चित्रपटांमध्येही पाहायला मिळत आहेत. याशिवाय अनेक जण हिंदी वेबसिरिजमध्ये देखील काम करत आहेत. हिंदी प्रेक्षकांकडूनही मराठी कलाकारांना प्रचंड प्रेम मिळत आहे. यानंतर आता मराठी मालिकेतील अभिनेत्री हिंदी वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घराघरात पोहचली. यानंतर आता ज्ञानदाने उंच झेप घेतली आहे.
ज्ञानदाचा मोठा चाहता वर्ग असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. ज्ञानदाने पोस्ट शेअर करत हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी लागल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ज्ञानदा लवकरच ‘कमांडर करण सक्सेना’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. ज्ञानदाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात ती तिच्या व्हॅनिटी व्हॅन बाहेर दिसते. या वेब सीरिजमध्ये ती मिली हे पात्र साकारताना दिसणार आहे.
View this post on Instagram
‘लोक मला विचारायचे आता पुढे काय? माझी पहिली हिंदी वेब सीरिज, आपली पहिली हिंदी वेब सीरिज- ‘कमांडर करण सक्सेना’. ‘कमांडर करण सक्सेना’मधील मिली तुम्हाला भेटायला येत आहे”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. ज्ञानदाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं अभिनंदन आणि कौतुक केले आहे. Actor Dnyanada Ramtirthkar |
विशेष म्हणजे या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे ही देखील मुख्य भूमिकेत आहे. हृताची देखील ही पहिलीच हिंदी सीरिज आहे. त्यामुळे दोन मराठमोळ्या अभिनेत्री यात पाहायला मिळणार आहे. यासोबतच अभिनेता गुरमीत चौधरी आणि इकबाल खान मुख्य भूमिकेत आहेत. ‘कमांडर करण सक्सेना’ वेब सीरिज ८ जुलैपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. Actor Dnyanada Ramtirthkar |
हेही वाचा:
बँकिंग-टेक शेअर्स वाढले ; सेन्सेक्स अन् निफ्टी नवीन विक्रमी पातळीवर उघडले





