Shri Vighnahar Factory : श्री विघ्नहर कारखान्याची ४४ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न !
श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ४४ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

Shri Vighnahar Factory : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ४४ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेस मोठ्या संख्येने सभासद बंधू-भगिनी उपस्थित होते. सभेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विघ्नहरचे संस्थापक चेअरमन स्व. निवृत्तीशेठ नामदेव शेरकर यांच्या व स्व. सोपानशेठ नामदेव शेरकर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. सभेच्या सुरुवातीस सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी केले.
प्रस्ताविक करत असताना चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी मागील सन २०२५-२६ गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या ऊसास एफआरपी प्रमाणे संपुर्ण पेमेंट अदा केले आहे. तसेच सभासदांची दिवाळीही गोड केले जाईल याची ग्वाही सर्व सभासद व ऊस उत्पादकांना दिली. कारखान्याचे विस्तारीकरण झाल्यामुळे गाळप हंगामात कारखाना १२ ते १३ लाख मे.टन ऊसाचे सहज गाळप करु शकतो.
हंगामात ११ ते १२ लाख मे.टनाचे गाळप केलेस विस्तारीकरणाचा फायदा होऊन त्यासाठी घेतलेले कर्ज परतफेड करणेस मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊसाची लागवड करुन आपल्याच कारखान्यास गाळपासाठी ऊस द्यावा असे अवाहन केले. त्याचबरोबर कारखान्याचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण केलेल्या कामाबाबत चेअरमन सत्यशिल शेरकर त्यांनी सविस्तर माहीती दिली.
मागील गाळप हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी, एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादन घेतलेले शेतकरी, जास्तीत जास्त ऊस तोडणी व ऊस वाहतूक करणारे कंत्राटदार, हार्वेस्टरने जास्तीत जास्त ऊस तोडणी करणारे कंत्राटदार, एकरी १०० मे. टनापुढील उत्पादन घेणारे शेतकरी यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देवून सत्कार करण्यात आला. बाबांच्या जयंती निमित्त झालेल्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला.
४४ व्या अधिमंडळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषय उपस्थित सभासदांनी उत्स्फूतपणे एकमताने मंजूर केले. कारखान्याच्या कामकाजाविषयी बोलताना अनेक सभासदांनी चेअरमन सत्यशिल शेरकर व संचालक मंडळाचे तोंड भरुन कौतुक केले. विघ्नहरच्या कामकाजाविषयी चर्चा होत असताना चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्ठ व पारदर्शक कामकाज सुरु असल्याचे सभासदांनी बोलून दाखविले.
विघ्नहर बदलत्या काळाबाबत अपडेट होत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने कारखान्याची प्रगती अतिशय समाधानकारक असल्याचे सभासदांनी बोलून दाखविले. यावेळी बहुसंख्य सभासदांनी प्रश्न विचारुन सभेच्या चर्चेत सहभाग घेतला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी योग्य उत्तरे दिल्याने सभासदांचे समाधान होत असल्याने सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.
कारखान्याने कार्यक्षेत्रातील एकरी ऊसाचे उत्पादन वाढविणेसाठी स्वतंत्र ऊस विकास विभाग तयार करुन त्यामध्ये नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. सदर कर्मचाऱ्यांना वसंतदादा इन्स्टीट्यूट मांजरी बु., पुणे, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व कारखान्यावर योग्य ते प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणेसाठी सदर कर्मचाऱ्यांची प्रत्येक गटात नियुक्ती केली आहे. तरी शेतकऱ्यांनी एकरी ऊस ऊपादन वाढीसाठी ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन घ्यावे, असे सत्यशिल शेरकर यांनी या वेळी सांगितले.
यावेळी कारखान्याचे सभासद गंगाराम लोखंडे, सुरेश वाणी, किसन आरोटे, दिलीप लायगुडे, लक्ष्मण हांडे, सुधाकर डुंबरे, सुनिल कवडे, बबन गुंजाळ, विजय भोर, प्रमोद खांडगे, मनोहर शेटे, आदि सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. 44 व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी केले. दुःखवट्याचा ठराव सेक्रेटरी अरुण थोरवे यांनी मांडला तर उपस्थितांचे आभार व्हाईस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले.





