Vani Kapoor : ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर तो प्रश्न अन् अभिनेत्री वाणी कपूरने दिलं बेधडक उत्तर, म्हणाली “मी सेन्सॉरशिप ऐकते तेव्हा…”

Vani Kapoor : बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूरने ‘अबीर गुलाल’ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानसोबत काम केले होते. या चित्रपटाला खूप विरोध झाला आणि त्यावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर या चित्रपटाच्या अनुषंगाने एका मुलाखतीत वाणी कपूरला बॅायकॅाट विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने आपले स्पष्ट मत व्यक्त करत बेधडक उत्तर दिले.
वाणी कपूर तिच्या आगामी ‘मंडेला मर्डर्स’ या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. लवकरच ही सिरीज रिलीज होणार असून, या सिरीजसाठी जोरदार प्रमोशन वाणी करताना दिसत आहे. या सिरीजच्या प्रमोशन दरम्यान, वाणी कपूरने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत तिच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाला बायकॅाट केल्यामुळे काय परिणाम झाला असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना ती म्हणाली, ‘मी सेन्सॉरशिपच्या बाजूने नाही. मला वाटतं की तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकता, कधीकधी असं होतं की त्याला मर्यादा नसते. कधीकधी जेव्हा मी सेन्सॉरशिप ऐकते तेव्हा मला वाटतं की ते कोणालाही आणि काहीही काढून टाकू शकतात, असे बेधडक उत्तर तिने दिले.
सेन्सॉरशिपवर पुढे बोलताना वाणी कपूर म्हणाली, की तिला बॅायकॅाट आणि बंदी घालण्याची संस्कृती समजत नाही, असे म्हणत तिने आपले मत मांडले. याशिवाय तिने म्हणाली की कधीकधी लोक एकमेकांशी खूप कठोरपणे वागतात.
अभिनेत्री वाणी कपूरचा अबीर गुलाल हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानसोबत तिने काम केले होते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घातली. यामुळे अबीर गुलाल या चित्रपटावरही भारतात रिलीज करण्यासाठी बंदी घालण्यात आली होती.





