Rajeshwari Kharat : तो एक फोटो अन् राजेश्वरी झाली पुन्हा ट्रोल!

Rajeshwari Kharat : काही कलाकार सोशल मीडियावर या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री राजेश्वरी खरात सतत चर्चेत राहिले आहे. कधी ती जब्यासोबतच्या (सोमनाथ अवघडे) फोटोमुळे चर्चेत आली, तर कधी तिने एखाद्या गाण्यावरून तयार केलेल्या रीलमुळे. सध्या राजेश्वरी एका सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिला या फोटोवरून ट्रोल करण्यात येत आले आहे.
राजेश्वरीवरचा मोठा फॅन फोलोइंग असून, असे असले तरी तिला अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. राजेश्वरीला ट्रोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही तर तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. नुकताच तिने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून अभिनेता शाहरूख खानसोबतचा एक फोटो एआयच्या मदतीने एडिट करून शेअर केला आहे.
बॅालिवूडचा किंग खान शाहरुखसोबत आपला एकतरी फोटो असावा असे अनेकांना नेहमी वाटत असते. सोशल मीडियावर एआयच्या मदतीने राजेश्वरीने शाहरुखसोबत सेल्फी काढल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. याची काहीच गरज नव्हती. तर दुसऱ्या एकानं लिहिलं की, वाईट एडिटींग, अशा काही कमेंट्स या फोटोवर करण्यात आल्या आहेत.
तिच्याविषयी बोलयाचे झाल्यास तिने दिग्दर्शक नागराज मुंजळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटातील तिने शालू नावाचे पात्र साकारले होते. या पात्रामुळे अभिनेत्री राजेश्वरीचे कौतुक करण्यात आले. आता ती लवकरच फॅन्ड्री चित्रपटातील तिचा सहकलाकार सोमनाथ अवघडेसोबत एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.





