BMC Ward committee Election : ‘ती’ एक चूक अन् गेम फिरला! मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोड
BMC Ward committee Election : ठाकरे गटाच्या दोन नगरसेविकांची मते अवैध ठरली असून, याचा फायदा भाजपला झाला आहे. भाजपच्या साक्षी दळवी अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.

BMC Ward committee Election : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) उर्वरित पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी सोमवार ९ मार्च रोजी निवडणूक पार पडली. यातील एस अँड टी प्रभाग समितीमध्ये (विक्रोळी, भांडुप-मुलुंड परिसर) नाट्यमय घडामोडी घडल्या.
उबाठा गटाच्या (ठाकरे सेना) दोन अनुभवी नगरसेवक-नगरसेविकेने मतदान फॉर्मवर चुकीच्या कॉलममध्ये सही केल्याने त्यांची दोन मते अवैध ठरली. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आणि भाजपच्या साक्षी दळवी या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निवडून आल्या.
मुंबई महानगरपालिकेतील एकूण १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी यापूर्वी निवडणूक झाली आहे. यापैकी ११ समित्यांवर भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले. उर्वरित सहा समित्यांच्या अध्यक्षांमध्ये उबाठाचे दोन, काँग्रेसचे दोन, मनसेचे एक आणि एमआयएमचे एक उमेदवार निवडून आले आहेत.
एस आणि टी प्रभागाच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं? BMC Ward committee Election
एस आणि टी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी १० मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या विरोधात उबाठा गटाचे सुरेश शिंदे यांना आठ मते मिळाली. ठाकरे गटाची दोन मते ऐनवेळी एका चुकीमुळे अवैध ठरली. या समितीमध्ये महायुतीचे १० आणि ‘उबाठा’ सह मित्रपक्षांचे १० असे एकूण २० सदस्य आहेत. त्यामुळे येथे निवडणूक पार पडली.
BMC Ward committee Election
भाजपने संधीचा फायदा उचलला BMC Ward committee Election
ठाकरे बंधूंच्या युतीनंतरही प्रभाग समिती निवडणुकीत उबाठा गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. एका प्रभागातच चुकीच्या मतांमुळे पराभव झाल्याने पक्षांतर्गत चर्चा सुरू झाली आहे. भाजपने मात्र या संधीचा फायदा उचलला. मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीने पुन्हा एकदा राजकीय समीकरणे कशी बदलू शकतात, हे दाखवून दिले आहे.
हेही वाचा : Israel-Iran War: “अमेरिका नाही तर आम्ही ठरवणार” ; युद्धबंदीच्या ट्रम्पच्या दाव्याला इराणचे प्रत्युत्तर





