Actress Nazima passes away : क्लासिक सिनेमातील तो चेहरा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध अभिनेत्री नाझिमा यांच निधन

Actress Nazima passes away : बॅालिवूड इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ६० आणि ७० च्या दशकात आपल्या सहजसुंदर अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन झालं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नाझिमा यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दादर येथील निवासस्थानी त्या आपल्या मुलाबरोबर राहत होत्या. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी आणी जवळच्या मित्रपरिवाराने दिली आहे. ११ अॅागस्ट २०२५ रोजी त्याचं निधनं झाल्याचं वृत्त आहे. अभिनेत्री नाझिमा यांचं खरं नाव मेहर उन निसा असं होते. त्यांचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सिनेमाइंडस्ट्रीशी संबधित होती.
त्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात बालकलाकार म्हणून केली. हस्न बानो या प्रसिद्ध दिग्दर्शक अस्पी इराणी यांच्या पत्नी होत्या. नाझिमा यांना खरी ओळख ही ‘देवदास’, ‘बिराज बहू’ आणि ‘अब दिल्ली दूर नहीं’ यांसारख्या सिनेमांनी मिळवून दिली. ६० आणि ७० च्या दशकात क्लासिक सिनेमांचा त्यावेळी बोलबाला होता.
या काळात नाझिमा या प्रामुख्याने सिनेमातील मुख्य अभिनेत्रीच्या बहिणीच्या रोलमध्ये दिसत असायच्या. त्यांनी राजेश खन्ना, संजीव कुमार, धर्मेंद्र यांसारख्या अभिनेत्यांबरोबर स्क्रिन शेअर केली आहे. गेल्या काही काळापासून नाझिमा सिनेमाइंडस्ट्रीपासून दूर होत्या.
हेही वाचा : ‘सर्वाधिक बिघडलेली महिला, अमिताभ बच्चन यांच्या पत्नी म्हणून…’; कंगना जया बच्चन यांच्यावर संतापली





