Thandel Movie : ‘थांडेल’ रिलीजसाठी सज्ज! नागा चैतन्य, साई पल्लवीची अॅान स्क्रीन केमेस्ट्री, निर्मात्यांकडून प्रमोशनसाठी अनोखी शक्कल

दाक्षिणात्य अभिनेता आणि नागार्जुनचा मोठा मुलगा अभिनेता नागा चैतन्यचा ‘थांडेल’ चित्रपटाची मोठी चर्चा केली जात आहे. या चित्रपटाच्या मेकर्सनी थांडेलला पॅन इंडियामध्ये रिलीज करण्याचे ठरवले असून काही प्रमुख शहरांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यात येणार आहे. अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला थांडेल चित्रपट आहे.
चंदू मोंडेटी दिग्दर्शित हा चित्रपट रोमान्स आणि देशभक्तीचा मिलाफ आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नागा चैतन्यच्या कारकिर्दीतील हा त्याचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. जो वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित आहे.
या चित्रपटातील अभिनेता नाग चैतन्याचे पात्र त्याच्या इतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा फार वेगळे असणार आहे. त्यामुळेच आता या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करण्याचा निर्णय चित्रपटाच्या मेकर्सनी घेतला आहे. थांडेल चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यासाठी गीता आर्ट्स सज्ज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थांडेलच्या रिलीजपूर्वी चित्रपट निर्माते आणखी दोन गाणी आणि ट्रेलर लॉन्च करणार आहेत. चित्रपटाला तेलुगू नसलेल्या प्रेक्षकांच्या जवळ नेण्यासाठी मुंबई आणि चेन्नई सारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. थांडेलचे पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. या चित्रपटाची निर्मिती बानी वास यांनी केली असून, देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.
चैतन्य अन् साईची अॅान स्क्रीन केमेस्ट्री
अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या जोडीने प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवलेली आहे. थांडेल चित्रपटातील दोघांची अॅानस्क्रीन केमेस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेले आहेत. या चित्रपटाचा टीझर आणि एक गाण देखील रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याला आणि टीझर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.




