Thalapathy Vijay: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय in Action Mode ; विजय यांनी केली ‘या’ पहिल्या तीन आदेशावर स्वाक्षरी
Thalapathy Vijay: आज तामिळनाडूमध्ये नवीन सरकारचे उद्घाटन झाले आहे. व्हीसीके आणि आययूएमएलच्या पाठिंब्याने, थलपथी विजय यांच्या टीव्हीके पक्षाने आता सरकार स्थापन केले आहे.

Thalapathy Vijay: आज तामिळनाडूमध्ये नवीन सरकारचे उद्घाटन झाले आहे. व्हीसीके आणि आययूएमएलच्या पाठिंब्याने, थलपथी विजय यांच्या टीव्हीके पक्षाने आता सरकार स्थापन केले आहे. आज सकाळी १० वाजता विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. टीव्हीकेच्या नऊ आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. प्रथेनुसार, तामिळनाडूचे मावळते मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
#WATCH | Chennai | Tamilaga Vettri Kazhagam (TVK) Chief C Joseph Vijay signs the first set of documents after taking oath as the Chief Minister of Tamil Nadu. pic.twitter.com/ry1XMNTW06
— ANI (@ANI) May 10, 2026
रविवारी विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. चेन्नईतील नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये शपथ घेतल्यानंतर, त्यांनी तामिळनाडूच्या जनतेला मोठी भेट दिली आहे. त्यांनी घरगुती ग्राहकांना २०० युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दल स्थापन करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.
विजय यांनी केली ‘या’ पहिल्या तीन आदेशावर स्वाक्षरी Thalapathy Vijay:
* दरमहा २०० युनिट मोफत वीज
* प्रत्येक जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी पथकाची स्थापना
* महिला सुरक्षा दलाची स्थापना





