अपत्यप्राप्तीचा “हवाई’ आनंद
Updated On:

कोलकाता : दोह्याहून बॅंकॉककडे जाणाऱ्या विमानातच एका थाई महिलेने बाळाला जन्म दिला. त्यामुळे हे विमान आपत्कालीन स्थितीत कोलकात्यात उतरवावे लागले. मंगळावारी (दि. 4) ही घटना घडली.
कतार एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी प्रसुतीच्या वेळी या महिलेला मदत केली. कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात आता बाळ आणि तिची आई दाखल आहेत. त्या दोघांची प्रकृत्ती उत्तम असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
दोहाहून बॅंकाकला जाणारे विमान पहाटे तीन वाजून नऊ मिनिटांनी उतरले. वैद्यकीय कारणांसाठी हे विमान उतरवू देण्याची मागणी विमानचालकाने केली होती. हे विमान सुरक्षितरित्या उतरल्यानंतर विमानतळावरील वैद्यकीय पथकाने या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल केले.




