Sushma Andhare : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याची जोरदार चर्चा झाली. यामुळे शिवेसेना-भाजपमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. या तणावाबद्दल शिवसेनेची मंत्री उघडपणे बोलताना दिसत नसले तरी, त्यांच्या विधानांमुळे त्या गोष्टी जाणावत आहेत. राज्याच्या राजकारणात या सगळ्यांचा उहापोह होत असतानाच आता शिवसेनेचे मंत्री उदय सावंत यांनी एक मोठा दावा केला आहे. सुषमा अंधारे यांनी नरेश मस्के यांची भेट का घेतली होती? हे मला माहित असल्याचे सामंत म्हणाले. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. सामंतांनी केलेल्या वक्तव्यामुळे अंधारे आणि म्हस्के यांच्यात भेटीचा विषय चांगलाच चर्तेत आला आहे. आता या दाव्यावर सुषमा अंधारे यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत जोरदार प्रत्युत्तर देत एक फोटो शेअर केला आहे. प्रिय उदयभाऊ, आज एका जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही शिंदेंमुळे दखलपात्र झाला आहात हे मान्य केले. पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी दिले. त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली. तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक मुत्सद्दी राजकारणी आहात हे सिद्ध केले. शिवसेनेकडून श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना आपण सत्तेसाठी कुणासोबतही जाऊ शकता हे सिद्ध केले, असा जोरदार निशाणा अंधारेंनी उदय सामंत यांच्यावर साधला. उदयभाऊ, आता उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? माझ्यामुळे आपल्या सुप्त इच्छा जगजाहीर झाल्या आहेत का? कदाचित त्यामुळेच आपण आज वैतागून माझी आणि नरेश मस्के यांची भेट झाल्याचे मुलाखतीत सांगत होतात, असे म्हणत अंधारेंनी सामंत यांनी केलेल्या दाव्याला उत्तर दिले आहे. नरेश मस्के आणि सुषमा अंधारे यांच्यात झालेल्या भेटीबाबतही त्यांनी भाष्य केले आहे. होय माझी आणि नरेश मस्के यांची नक्की भेट झाली. भेट घेतली नाही भेट झाली. असे स्पष्टीकरण अंधारेंनी दिले आहे. दिल्ली महाराष्ट्र सदनच्या उपहारगृहामध्ये चहासाठी बसल्यानंतर भेट झाली. माझ्या समवेत माझ्या पक्षाचे खा. भाऊसाहेब वाकचौरे असताना बाजूला खा. भगरे गुरुजी असताना आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बसलेले असताना माझी भेट झाली, असे त्यांनी सांगितले. प्रिय उदयभाऊ, आज एका जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही शिंदेंमुळे दखलपात्र झाला आहात हे मान्य केले. ….पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी दिले…!त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली…!!तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक… pic.twitter.com/ldAK9ENMja — SushmaTai Andhare (@andharesushama) November 22, 2025 या भेटीबाबत सुषमा अंधारे यांनी भेट झाल्यावर मी सगळ्यात आधी माझ्या पक्षप्रमुखांना ही माहिती दिली हे कदाचित आपल्याला माहित नसेल. पण तरीही मी समजूच शकते, असा टोला त्यांनी लगावला. उदयभाऊ, आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात. आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलं तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, असा दावाही सुषमा अंधारेंनी केला आहे. या पोस्टमध्ये सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत असलेला फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता अंधारेंनी केलेल्या टीकेला उदय सामंत काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : दिल्लीचा नकाशा बदलणार! आता ११ ऐवजी १३ जिल्ह्यांची होणार नोंद ; जनतेला काय फायदा होणार? वाचा