“ठाकरे सरकार’चा ग्रॅंड शपथविधी
Updated On:

शिवतीर्थावर सहा हजार चौ.फू. स्टेज, 60 हजार खुर्च्या, 20 एलईडी
मुंबई- उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवसेनेने जय्यत तयारी केली आहे. जिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाज घुमला, त्या शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या साक्षीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
शिवाजी पार्कमध्ये सहा हजार चौरस फुटांवर भव्य व्यासपीठ उभारले जात आहे. मंचावर शंभर जणांना बसण्यासाठी आसन व्यवस्था केली जाईल. शपथविधीचे साक्षीदार होण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी 60 हजार खुर्च्यांची सोय करण्यात येणार आहे.
शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कानाकोपऱ्यात 20 एलईडी लावले जाणार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीलाही सजवण्यात येत आहे.





