विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरे पक्ष आग्रही
Updated On:

मुंबई – लोकसभा निवडणुकीत कमी जागांवर विजय मिळाला असतानादेखील भाजपसह महायुतीने विधानसभ निवडणूकीत दमदार कामगिरी केली. दुसरीकडे मविआला फक्त 46 जागांवरच विजय मिळाला.
यामुळे विधानसभेतील विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पण संख्याबळ नसतानाही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे.
ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव म्हणाले, नवीन सरकारचा शपथविधी झाला, विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली, मुख्यमंत्री पदाची शपथ झाली की विद्यमान सरकार आणि विधानसभेच्या अध्यक्षाकडे विरोधी पक्षनेते पद मिळावे, याची मागणी करणार आहोत, असे विधान त्यांनी केले.





