ठाकरे बंधू तब्बल १९ वर्षानंतर एकाच व्यासपीठावर; आतापर्यंत कधी पाहायला मिळाले एकत्र…

Raj Thackeray- Uddhav Thackeray | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. मराठी भाषेच्या मुद्यावर १९ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे. वरळीतील डोम सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, मोठी जय्यत तयारी मेळाव्यासाठी करण्यात आली आहे.
२००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थापना झाल्यानंतर तब्बल १९ वर्षानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. 2006 मध्ये ताटातूट झाल्यापासून ते अनेकदा एकत्र आले, कधी सार्वजनिक कार्यक्रमात, तर कधी घरगुती समारंभात दोघे एकत्र पाहायला मिळाले. Raj Thackeray- Uddhav Thackeray |
- 17 जुलै 2012 – उद्धव ठाकरेंना छातीत दुखत असल्यानं लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी अलिबागमध्ये मनसेच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या राज ठाकरेंनी कार्यक्रम अर्धवट सोडून हॉस्पिटलकडे धाव घेतली. शस्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यासाठीही राज ठाकरे स्वत: कार घेऊन गेले होते.
- 17 नोव्हेंबर 2012 महिन्यात बाळासाहेबांचं निधन झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र दिसले.
- 10 जानेवारी 2015 – दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरलं होतं. त्यासाठी राज ठाकरे आवर्जून उपस्थित राहिले होते.
- 12 डिसेंबर 2015 – शरद पवारांच्या पंचाहत्तरीनिमित्त मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरमधील कार्यक्रमात सर्वपक्षीय दिग्गज उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांचं भाषण सुरू असतानाच उद्धव ठाकरेंची एन्ट्री झाली आणि राज ठाकरेंनी बंधूराज आले म्हणत खास शैलीत टिप्पणी केली होती.
- 27 जानेवारी 2019 – राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांच्या विवाहसोहळ्याला उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे आणि आदित्य यांच्यासह हजर राहिले होते.
- 28 नोव्हेंबर 2019 – उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहिले.
- 22 डिसेंबर 2024 – राज ठाकरेंची बहीण जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाचं लग्न दादरमधील राजा शिवाजी विद्यालयात पार पडलं. यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले.
- 24 फेब्रुवारी 2025 – अंधेरीत एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसले.
दरम्यान, आज (५ जुलै) मेळाव्याच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. ती घडामोड ठाकरेबंधूंचे बहुचर्चित मनोमिलन घडवणारी ठरणार का, याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. Raj Thackeray- Uddhav Thackeray |
हेही वाचा :





