TET Scam: परिक्षा घेणाऱ्या जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजीसचे प्रमुख गणेशन यांची चौकशी
Updated On:

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीइटी) गैरव्यवहार प्रकरणात परीक्षा घेणाऱ्या जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नाॅलोजीस या कंपनीच्या प्रमुख संचालक गणेशन यांची मंगळवारी सायबर गु्न्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. गणेशन यांनी बंगळुरू न्यायालयाकडून अटकेपासूनचे संरक्षण मिळवले आहे.
शिक्षक पात्रता गैरव्यवहार प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे निलंबित आयुक्त तुकाराम सुपे, तत्कालिन आयुक्त सुखदेव डेरे, सनदी अधिकारी शालेय शिक्षण विभागाचे तत्कालिन उपसचिव सुशील खोडवेकर, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर तसेच जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नोलाॅजीसचे संचालक डाॅ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार यांना अटक करण्यात आली आहे.




