गावसकरांनी गिलख्रिस्टला फटकारले; म्हणाले “जे खेळाडू आयपीएल स्पर्धेत…”
Updated On:

मुंबई – आयपीएल स्पर्धेसाठी विंडो देत आयसीसीने या स्पर्धेचे महत्व मान्य केले आहे, असे वक्तव्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माजी कसोटीपटू ऍडम गिलख्रिस्ट याला विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी फटकारले आहे.
जे खेळाडू आयपीएल स्पर्धेत फारसे खेळले नाहीत व ज्यांना त्यातून काही लाभ झाला नाही असेच खेळाडू आता या स्पर्धेवर टीका करत आहेत. मात्र, आयपीएलमुळे जागतिक क्रिकेटवर परिणाम होतो आहे या गिलख्रिस्टच्या मतावर मला हसू आले. जबाबदार व्यक्तीने अत्यंत भान ठेवूनच वक्तव्य केले पाहीजे, अशा शब्दात गावसकर यांनी गिलख्रिस्टच्या मतांचा समाचार घेतला आहे.


