टेस्ला भारतात करणार धमाकेदार एन्ट्री, ‘हे’ कार मॉडेल सर्वातआधी होणार लाँच

Tesla coming to India | अमेरिकेची इलेक्ट्रिक कार कंपनी TESLA लवकरच भारतात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. कंपनीने भारतात नोकरभरती देखील सुरू केली होती. तसेच, शोरूम उघडण्यासाठी जागाही जवळपास निश्चित केली आहे. आता कंपनी कोणत्या कार मॉडेलसोबत भारतात प्रवेश करणार याबाबतची माहिती समोर आली आहे.
टेस्ला मॉडेल Y आणि मॉडेल 3 सह भारतात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. कंपनीने होमोलोगेशन (सरकारी अधिकाऱ्यांद्वारे अधिकृत मंजूरी) अर्ज दाखल केला आहे. कारच्या विक्रीसाठी परवानगी मिळाल्यानंतर टेस्लाला भारतात या गाड्या लाँच करता येईल.
भारतात वाहनांना होमोलोगेशन परवानगी देण्याची जबाबदारी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) कडे आहे. ही एजन्सी वाहनं भारतीय कायद्यांनुसार गुणवत्ता, सुरक्षितता, कामगिरी, उत्सर्जन यासारख्या नियमांची पूर्तता करते की नाही याची खात्री करते. त्याआधारावरच प्रमाणपत्र जारी केले जाते.
टेस्लाने त्यांच्या मॉडेल 3 आणि मॉडेल वाय या दोन कारसाठी होमोलोगेशन प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे. 2021 मध्येटेस्लाने बंगळुरूमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने एका कंपनीची नोंदणी केली होती. नुकतेच, कंपनीने मुंबईतील बीकेसी येथे देशातील पहिल्या शोरूमसाठी जागा देखील निश्चित केली आहे.
टेस्ला मॉडेल 3 आणि मॉडेल वाय
टेस्ला मॉडेल 3 स्टँडर्ड रेंज प्लस, लाँग रेंज आणि परफॉर्मन्स व्हेरिएंटमध्ये येते. कारच्या टॉप मॉडेलमध्ये ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टम आहे. ही कार एका चार्जमध्ये 568 किमीपर्यंतची रेंज देते.
टेस्ला मॉडेल वाय देखील विविध व्हेरिएंटमध्ये येते. प्रकारांमध्ये उपलब्ध आहेयात ड्युअल-मोटर ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आहे, जी 531 किमी पर्यंतची रेंज प्रदान करते. दोन्ही कारमध्ये पॅनोरमिक ग्लास रूफ, टचस्क्रीन, ऑटोपायलट, ओवर-द-एयर (OTA) अपडेट आणि एक प्रीमियम साउंड सिस्टमसह अनेक फीचर्स मिळतात.
या दोन्ही मॉडेल्सची सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 25,000 डॉलर्सपेक्षा अधिक आहे. त्यामुळे कंपनी भारतात हे मॉडेल किती किंमतीत सादर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





