Terrorists Arrested : आयएसआय-अंडरवर्ल्ड नेटवर्कचा पर्दाफाश ! दिल्ली पोलिसांकडून 9 संशयित दहशतवाद्यांना अटक
राजधानी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि मुंबईच्या गुन्हेगारी जगताशी संबंधित असलेल्या एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा (Terrorists Arrested) पर्दाफाश करत नऊ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.

Terrorists Arrested : राजधानी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि मुंबईच्या गुन्हेगारी जगताशी संबंधित असलेल्या एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा (Terrorists Arrested) पर्दाफाश करत नऊ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.
नवी दिल्लीतील महत्त्वाच्या संस्था आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचा त्यांचा डावा होता. स्पेशल सेलची ही कारवाई अलिकडच्या वर्षांतील सर्वात मोठी कारवाई (Terrorists Arrested) मानली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले आरोपी पाकिस्तानस्थित आयएसआय आणि एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीच्या निर्देशानुसार काम करत होते. तपासात असे उघड झाले आहे की, या टोळीचा एक भाग दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून चालत होता. दुसरा भाग पाकिस्तानस्थित शहजाद भट्टी चालवत होता. या संपूर्ण कटाचा सूत्रधार आयएसआय असल्याचे मानले जात आहे.
तपास यंत्रणांनुसार, आरोपींना दिल्ली, मुंबई, राजस्थान आणि पंजाब येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून अत्याधुनिक विदेशी शस्त्रे, ग्रेनेड आणि स्फोटके जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात असेही सूचित होते की, जप्त केलेली स्फोटके सीमेपलीकडून भारतात तस्करी करून आणण्यात आली होती.
सूत्रांच्या दाव्यानुसार, हे नेटवर्क देशभरातील महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करण्याचा कट रचत होते. संभाव्य लक्ष्यांमध्ये वीज प्रकल्प, वीज निर्मिती आणि वितरण केंद्रे, विमानतळे, रेल्वे स्थानके आणि इतर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या सुविधांचा समावेश होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य करण्याची योजना असल्याचा संशय आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, स्पेशल सेलचे वरिष्ठ अधिकारी या नेटवर्कच्या निधीपुरवठा, शस्त्रपुरवठा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची सखोल चौकशी करत आहेत. या नेटवर्कचे इतर सदस्य देशाच्या विविध भागांमध्ये सक्रिय आहेत का, याचाही तपास यंत्रणा करत आहेत.
सुरक्षा यंत्रणांची ही कारवाई राजधानी आणि देशाच्या संवेदनशील आस्थापनांवर होणारा संभाव्य मोठा हल्ला (Terrorists Arrested) हाणून पाडल्याचे लक्षण मानले जात आहे.






