जम्मू काश्मीरमध्ये आढळले दहशतवाद्यांचे बंकर; ‘या’ वस्तू सापडल्या, पंजाबमधून पोहोचत होती मदत?

किश्तवाड: जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील १२,००० फूट उंचीवर असलेल्या दुर्गम आणि बर्फाच्छादित डोंगररांगांमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे एक मोठे कारस्थान उधळून लावले आहे. शोधमोहीमेदरम्यान जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे एक असे लपण्याचे ठिकाण (बंकर) सापडले आहे, जे पाहून सुरक्षा दलाचे जवानही थक्क झाले. हा एखाद्या सामान्य गुहेसारखा नसून, दगडांनी बनवलेल्या ‘मिनी किल्ल्या’प्रमाणे मजबूत बंकर होता.
‘कारगिल स्टाईल’ बंकर आणि कडेकोट तटबंदी –
किश्तवाडमधील सिंहपोरा भागातील घनदाट जंगलात हे ठिकाण सापडले. डोंगराच्या उतारावर आणि मोठ्या शिळांच्या आडोशाला हा बंकर अशा प्रकारे बांधला होता की, वरून पाहिल्यास तो अजिबात दिसून येत नव्हता. दाट झाडीमुळे ड्रोन कॅमेऱ्यांच्या नजरेतूनही हे ठिकाण वाचले होते.
मॅगी, बासमती आणि गॅस सिलिंडरचा साठा
बंकरची झडती घेतली असता तिथे मिळालेल्या साहित्याने सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे. या ठिकाणी मॅगीची ५० पाकिटे, २० किलो उच्च दर्जाचा बासमती तांदूळ, पीठ आणि तूप. गॅस सिलिंडर, मसाल्यांचे डबे, भांडी आणि औषधांचा मोठा साठा. थंडीपासून बचावासाठी सुकी लाकूडं आणि ताजी भाजीपाला देखील तिथे उपलब्ध होता.
धक्कादायक बाब म्हणजे, रेशनच्या काही गोण्यांवर ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (FCI) आणि पंजाब सरकारचे शिक्के आढळले आहेत. यामुळे सरकारी रेशनचा पुरवठा दहशतवाद्यांपर्यंत कसा पोहोचला, याबाबत आता गंभीर चौकशी सुरू झाली आहे.
50 packets of noodles, a full Crate of Tomato and potato, 15 type of spices,2 bags of 10 Kg Basmati rice, daal, bags of wheat, bajra,2 full size gas , burner, dry wood and walls fortified with stones pic.twitter.com/HeaLnjI5kO
— SPADEX (@spadex_716) January 19, 2026
हल्ल्यात एक जवान शहीद
रविवारी सुरक्षा दलांनी या बंकरला घेराव घातला असता, लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड फेकून अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण चकमकीत सात जवान जखमी झाले, तर हवालदार गजेंद्र सिंह उपचारादरम्यान शहीद झाले. अंधाराचा फायदा घेऊन जैशचा पाकिस्तानी कमांडर सैफुल्ला आणि त्याचा साथीदार आदिल पळून जाण्यात यशस्वी झाले.
इतक्या उंचीवर आणि दुर्गम भागात रेशन तसेच बांधकाम साहित्य पोहोचवणे स्थानिक मदतीशिवाय अशक्य असल्याचे सुरक्षा दलांचे मत आहे. या प्रकरणी आतापर्यंत ४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पळालेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात मोठी शोधमोहीम राबवली जात आहे.
VIDEO | Kishtwar, J&K: Search operations are underway after an encounter broke out between security forces and terrorists in a remote forest area of the district.#Kishtwar #JammuAndKashmir #SecurityForces
(Disclaimer: Visuals deferred by unspecified time)
(Full video… pic.twitter.com/ZwJXohxJA8
— Press Trust of India (@PTI_News) January 18, 2026





