Terrorist Attack : “पाकिस्तानशी आता थेट युद्ध व्हायला हवे…”; दिशा पाटणीच्या बहिणीचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Terrorist Attack – ‘मी आता हे सहन करू शकत नाही. आपण वर्षानुवर्षे शांततेबद्दल बोलत आहोत, पण दहशतवाद्यांनी आपल्या या कमकुवतपणाचा फायदा घेतला आहे. युद्ध हा शेवटचा उपाय असू शकतो, पण आता ती वेळ आली आहे. पाकिस्तान आणि त्याच्या सैन्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे.
हा सामान्य दहशतवादी हल्ला नाही तर पाकिस्तानी सैन्याचा कट आहे. एक माजी सैन्य अधिकारी म्हणून मी म्हणते की, आपले सैन्य तयार आहे, त्यांना फक्त आदेशांची आवश्यकता आहे’, अशा शब्दांत माजी लष्करी अधिकारी खुशबू पाटणीने उघडपणे तिचा राग व्यक्त केला आहे. ती अभिनेत्री दिशा पाटणीची बहीण आहे.
View this post on Instagram
मंगळवार, २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतीच्या आगीत होरपळून निघाले. दहशतवाद्यांनी क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आणि धर्माच्या आधारावर २६ निष्पाप लोकांना निवडकपणे ठार मारले.
या भयानक घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. सामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत, या हल्ल्याविरुद्ध सर्वजण संतापाने भरलेले आहेत आणि सोशल मीडियावर त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
उत्तर प्रदेशातील बरेली येथे नऊ महिन्यांच्या मुलीला वाचवून अलीकडेच प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या खुशबूने पहलगाम हल्ल्यावरील तिच्या प्रतिक्रियेने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. धर्माच्या नावाखाली केलेला हा अत्याचार आहे आणि तो आता सहन केला जाऊ शकत नाही.
माझा भारतीय सैन्याच्या ताकदीवर विश्वास आहे. हा हल्ला केवळ एक घटना नव्हती तर एका सुनियोजित कटाचा भाग होता. आता सरकारने दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेऊन निर्णायक कारवाई करावी.





