उत्तर काश्मिरात सोपोरे क्षेत्रात दहशतवादी हल्ला
Updated On:

श्रीनगर : उत्तर काश्मिरात सोपोरे क्षेत्रातल्या बारामुल्ला जिल्ह्यात काल संध्याकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात, एक विशेष पोलीस अधिकारी शहीद झाला तर एका नागरिकांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यात दोन पोलीसही जखमी झाले असल्याची माहिती सोपोरेच्या पोलिस अधिक्षकांनी दिली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी या संपूर्ण क्षेत्रात व्यापक शोध मोहीम सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.





