पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; चार जणांना अटक
Updated On:

चंदिगड – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानस्थित एक टेरर मोड्युल उद्वस्त केल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघाजणांना अटक केली आहे. पंजाब पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
स्वातंत्र्यदिनामुळे पंजाब आणि हरियाणा या राज्यांची संयुक्त राजधानी असलेल्या चंदिगडमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या नाकाबंदीदरम्यान पाकिस्तानातील “आयएसआय’ या गुप्तचर संघटनेचा पाठिंबा असलेले एक टेरर मोड्युल उघड करून 4 जणांना अटक केली गेली आहे. कॅनडास्थित अर्श दल्ला आणि ऑस्ट्रेलियास्थित गुरजंत सिंग यांनाही अटक करण्यात आली आहे, असे पंजाब पोलिसांनी म्हटले आहे. त्यांच्याकडून तीन हातबॉम्ब, 1 आयईडी, 9 एमएमची 2 पिस्तुल आणि 40 जिवंत काडतुसे ताब्यात घेण्यात आली आहेत, असे पोलिसांनी सांगितले.





