Big News: अहमदनगरमध्ये कंटेनर-रिक्षाचा भीषण अपघात 6 जणांचा जागीच मृत्यू
Updated On:

अहमदनगर – कंटेनर-रिक्षाची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघाताची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोहेगाव कोपरगाव रोडवर हा अपघात झाला आहे.
पोहेगाव कोपरगाव रोडवर भरधाव कंटेनर-रिक्षाची धडक झाली आहे. या अपघात एवढा भीषण होता की यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दहा जण जखमी झाले आहे. जखमीपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त जखमींना जनार्दन स्वामी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये 2 महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा समावेश आहे.
या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य सुरु केले. मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पुढीत तपास पोलीस करत आहेत.





