धनतेरसच्या दिवशीच भीषण अपघात; भरधाव ट्रकने १० जणांना चिरडले, ६ जणांचा मृत्यू
Updated On:

गाझीपूर – ऐन धनतेरसच्या दिवशी उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथे मोठी घटना घडली आहे. एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला असेलेल्या झोपडीला उडवत त्यामधील १० जणांना चिरडले आहे. या भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर येथील ग्रामस्थ संतप्त झाल्याचे बघायला मिळाले आहे.
हा भीषण अपघात गाझीपूर जिल्ह्यातील अहिरोली गावाजवळ आज सकाळी सात वाजता घडला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मुहम्मदाबाद पोलिसांनी धाव घेतली असून बचाव कार्य चालू केले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणामुळे ६ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे येथील सतंप्त नागरिकांनी मृतदेह रस्यावर ठेवून रास्ता रोको केला असून नूकसान भरपाईची मागणी केली आहे.





