Shooting incident in Montenegro : मॅान्टेनेग्रोमध्ये तणाव…! अंधाधुंद गोळीबाराच्या घटनेत १० जणांचा मृत्यू ; आरोपीने कुटुबांतील सदस्यांचाही घेतला जीव

मॉन्टेनेग्रोमधील सेटिन्जे येथे एका व्यक्तीने सशस्त्र हल्ला केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गोळीबार करणाऱ्या संशयित व्यक्तीचे नाव अको मार्टिनोविक (वय ४५) असे आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने त्याच्याच कुटुबांतील १० जणांची हत्या केली असून काहीजण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिसांनी मोर्टिनोविकचा शोध सुरू केला आहे. पोलिसांचे पथके त्याचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली असून या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे येथे तणावाचे वातावरण असून मॅान्टेनेग्रोचे गृहमंत्री डॅमिलो सरनोविक यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेबाबची सविस्तर माहिती माध्यमांना दिली.
या हल्ल्याबद्दल बोलताना सरनोविक म्हणाले, हल्लेखोराने त्याच्या कुटुबांतील सदस्य, बारचा मालक आणि त्याच्या मुलांची हत्या केली होती. या क्षणी हल्लेखोराला अटक करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यामुळे संशयित आरोपीचा शोध लागेपर्यंत रहिवांशाना त्यांनी घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. कधी कधी असे लोक संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या सदस्यांपेक्षा अधिक धोकादायक असतात, अशी टिप्पणी त्यांनी यावेळी बोलताना केली. तसेच संशयित आरोपीचा शोध पोलीस घेत असून लवकरच त्याला पकडण्यात पोलिसांना यश येईल, असे देखील ते यावेळी म्हणाले.
वाद, भांडण अन् गोळीबार
मिळालेल्या माहितीनुसार, मार्टिनोविक हा एका बारमध्ये त्याच्या पाहुण्यांसोबत उपस्थित होता. त्यावेळी त्यांच्यात काही कारणांमुळे वाद झाले आणि वादाचे रुपांतर पुढे भांडणात झाले. त्यानंतर मार्टिनोविक हा घरी गेला आणि त्याने घरातून एक शस्त्र घेऊन तो येथे आला. त्यानंतर बारमध्ये गोळीबाराची घटना घडली. वॅाशिग्टंग पोस्टने दिलेल्या वृत्तानृसार त्याने आणखी चार जणांना मारण्याचा प्रयत्न केला होता. या हिंसक घटनेचा संशियत आरोपी मार्टिनोविक याचा पूर्वइतिहास आहे. २००५ मध्ये निलंबित शिक्षेचा समावेश आहे.





