Tennis championship | काव्या पांडे उपांत्य फेरीत

पुणे – एम टेनिस अकादमी आयोजित अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात आर्यन कीर्तने, सर्वज्ञ सरोदे, तनिष्क देवरे यांनी तर, मुलींच्या गटात श्रावी देवरे, काव्या पांडे या खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात पुण्याच्या आर्यन कीर्तने याने आरव पटेलचा 6-3, 6-2 असा पराभव केला. सर्वज्ञ सरोदे याने ऋषिकेश मानेवर टायब्रेकमध्ये 5-7, 7-6 (6), 6-2 असा विजय मिळवला. तनिष्क देवरेने राम मगदूमला 6-4, 6-2 असे पराभूत केले. राघव सरोदे याने सुजय देशमुखचा 6-3, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
मुलींच्या गटात श्रावी देवरेने तमन्ना नायरचे आव्हान 7-5, 6-0 असे संपुष्टात आणले. काव्या पांडे हिने रिशीता पाटीलचा 6-4, 6-4 असा पराभव केला. रित्सा कोंडकरने काव्या तुपेवर 6-1, 6-0 अशी मात केली. शिबानी गुप्तेने वीरा हरपुडेला 6-2, 6-2 असे नमविले.





