Tennikoit Championship : राज्य टेनिक्वाईट स्पर्धेसाठी पुणे संघ जाहीर…

पुणे – महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशन यांच्या विद्यमाने ४७ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा २०२३ उदगीर (लातूर) येथे दि.२३ डिसेंबर ते २५डिसेंबर २०२३ च्या दरम्यान आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे जिल्हा संघ निवड चाचणी. स्काऊट ग्राउंड, सदाशिव पेठ पुणे येथे घेण्यात आली.
सदर स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला आहे. निवडलेला संघ पलाशा, आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईल.
पुणे जिल्हा पुरुष वरिष्ठ गट आणि महिला वरिष्ठ गट संघ पुढीलप्रमाणे :
पुरुष : प्रथमेश ढवळे (कर्णधार), साहिल खेडेकर, आदित्य मेस्त्री, प्रणव पाटील, श्रेयश शेटे, आदित्य जाधव, प्रशिक्षकः यशवंत वेदपाठक, व्यवस्थापकः चंद्रकांत पिंपळे;
महिला : अश्विनी शेंडे (कर्णधार), शालू विश्वकर्मा, संस्कृती पायगुडे, दिप्ती कदम, तीर्था गव्हाणे, साक्षी गोपाळे, प्रशिक्षक : रूपाली पवार, व्यवस्थापकः बाळासाहेब जगताप.


