पुणे जिल्हा | शेलारपट्टा अंगणवाडीला दहा हजाराची मदत

पळसदेव, (वार्ताहर)- जिल्हा परिषद शाळा शेलारपट्टा येथे नागरिकांनी खर्चातून मिनी अंगणवाडी सुरु केली आहे. या भागातील पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी येथील नागरिकांनी वर्गणी करून मिनी अंगणवाडी सुरु केली आहे. यामध्ये सध्या सोळा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
येथे अद्याप शासनाच्या वतीने मिनी अंगणवाडीला मान्यता मिळाली नसल्यामुळे दर महिन्याला नागरिक तीन हजार रुपये जमा करून येथे शिकवणार्या शिक्षिकेचा पगार देत असल्याचे येथील जय हनुमान मंडळाचे अध्यक्ष रमेश पवार यांनी सांगितले.
येथे कामगार, मच्छीमार, मजुरी करणारे नागरिक, शेतकरी यांची मूल शिक्षण घेत आहेत. येथील अडचणींचा विचार करता शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विशाल बनसुडे यांनी स्वनिधीतून शेलारपट्टा येथील अंगणवाडीला दहा हजार रुपयाची मदत केली आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, विशाल बनसुडे, जया हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष रमेश पवार, नवनाथ इंजे, सोमनाथ शिंदे, महादेव इंजे, रोहिदास जावळे, दशरथ भोई, अनिकेत शिंदे सह नागरिक उपस्थित होते.





