Sinhagad Ghat : पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर काल संध्याकाळच्या सुमारास एक थरारक अपघात घडला. लाकडाची वाहतूक करणारा एक मालवाहू टेम्पो कोंढणपूर मार्गे सिंहगड -डोणजेच्या दिशेने येत असताना, एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला. नियंत्रण सुटलेला हा टेम्पो रस्त्याच्या कडेची लोखंडी सुरक्षा जाळी तोडून तब्बल १०० ते १५० फूट खोल दरीत कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, या टेम्पोमध्ये एकूण ५ जण प्रवास करत होते. सुदैवाने, टेम्पो दरीत कोसळत असतानाच सर्वांनी प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्या. यामुळे जीवितहानी टळली आहे. या अपघातात ३ जण किरकोळ जखमी झाले असून २ जण पूर्णपणे सुखरूप आहेत. Sinhagad Ghat Accident या घटनेची माहिती मिळताच सिंहगड वनविभागाचे परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना खोल दरीतून बाहेर काढत रुग्णवाहिकेतून जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हेही वाचा : Delhi liquor scam: केजरीवाल-सिसोदिया यांच्या सुटकेच्या आदेशाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार