पुणे शहरातील तापमान वाढणार
Updated On:

पुणे – कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रिय स्थितीमुळे गेले काही दिवस पुण्यासह मध्य महाराष्ट्रात काही अंशी ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस अनुभवायला मिळाला. मात्र, आता ही स्थिती पूर्णपणे निवळली असून, पुढील काही दिसवांत शहराचे तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुढील काही दिवस आकाश पूर्णपणे निरभ्र राहणार असून, त्यामुळे कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गेल्या आठवड्यात तुलनेने थंडीचे दिवस व हलका पाऊस पडल्यानंतर पुणे शहराला पुढे उष्ण दिवसांचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, गुरुवारी शिवाजीनगर येथे कमाल तापमान 36.2, किमान तापमान 18. 8 तर लोहगाव येथे 37.3 अंश सेल्सिअस तापमान होते.





