Tejaswani Lonari : तेजस्विनी लोणारीने दिली गुडन्यूज! घरी नव्या पाहुण्याचे आगमन; आत्याने शेअर केली खास पोस्ट “आयुष्यातलं सगळ्यात….”
Tejaswani Lonari : समाधान सरवणकर यांनी देखील बाबा झाल्याचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला.

Tejaswani Lonari : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तेजस्विनीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून, तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या गोड बातमीमुळे सरवणकर आणि लोणारी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
तेजस्विनीची नणंद आणि शिवसेनेच्या नेत्या प्रिया सरवणकर यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. ‘आज मी आत्या झाले. आमच्या घरात चिमुकल्या राजकुमाराचं आगमन झालं आहे. माझा भाऊ बाबा झाला आणि मला आयुष्यातलं सगळ्यात सुंदर नातं मिळालं. आत्या!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच तेजस्विनी आणि समाधान यांचं अभिनंदन करत त्यांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. त्यांनी केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत शुभेच्छा तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाधान सरवणकर यांनी देखील बाबा झाल्याचा आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला.
View this post on Instagram
तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांनी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दरम्यान, तेजस्विनीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटातून केली होती. त्यावेळी तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती.
या चित्रपटात तिने जितेंद्र जोशीच्या नायिकेची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘बाप रे बाप डोक्याला ताप’, ‘गुलदस्ता’, ‘बायको नंबर १’ आणि ‘बर्नी’ यांसारख्या अनेक चित्रपटात तिने भूमिका साकारत प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली.

