Bihar Election 2025 | Tejashwi Yadav : बिहारच्या निवडणुकीत भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने प्रत्येकी 101 जागांवर उमेदवार दिले होते. तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीसह एनडीएतील इतर मित्रपक्षांसाठी 41 जागा सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी भाजपाने 90 हून अधिक जागांवर तर जेडीयूने 80 पेक्षा जास्त जागावर आघाडी घेतली आहे. लोक जनशक्ती पार्टी जवळपास 28 जागांवर आघाडीवर असून इतर मित्रपक्षांनी चार जागांवर सरशी मिळवली आहे. दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या आरजेडीकडे 30 पेक्षा कमी आणि काँग्रेसला जवळपास चार जागांवर आघाडी मिळाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची लाट दिसून येत आहे. या लाटेत विरोधी पक्ष काँग्रेस, आरजेडी भुईसपाट झाले आहेत. विशेष म्हणजे राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढत असलेले तेजस्वी यादव हे पराभवाच्या छायेत होते. भाजप उमेदवाराने त्यांना शेवटपर्यंत झुंझवले मात्र त्यांनी 13 हजारांनी निसटता विजय मिळवला आहे. भाजपच्या सतीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना कडवी लढत दिली. मतमोजणीच्या 14 व्या फेरीत त्यांनी सात हजारांची आघाडी घेतली होती. त्यामुळे तेजस्वी यादव पराभूत होतात की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, 17 व्या फेरीत तेजस्वी यांनी सतीश कुमारांना मागे सोडल 17 फेरीत तेजस्वी यादव यांनी दीड हजार मतांची लीड घेतली होती. यी लीड हळूहळू वाढत होती. मात्र, सतीश कुमार हे देखील प्रत्येक फेरीमध्ये चांगली टक्कर देत होते. मात्र, 29 फेरीपर्यंत तेजस्वी यांनी 13 हजारांची आघाडी घेत आपला विजय निश्चित केला. भाजप 95 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे एनडीएमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जाऊ शकतो. तर, नितीश कुमार यांच्या पक्षाने 85 जागा जिंकल्या आहेत.