‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ शोमध्ये तेजस्वी प्रकाश लागली ढसाढसा रडू; नेमकं काय घडलं?

Tejasswi Prakash | अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या शोमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या हा शो चांगलाच गाजत आहे. या शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तेजस्वी प्रकाश ढसाढसा रडताना पाहायला मिळत आहे.
तेजस्वी शोच्या सुरूवातीपासून खूप मेहनत घेताना पाहायला मिळत आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कलाकारांना एक टास्क दिला होता. ज्यात मिस्ट्री बॉक्सनुसार त्यांना एक पदार्थ बनवायचा होता. मात्र तेजस्वी प्रकाशने बनवलेली डिश परीक्षकांना आवडली नाही. तेजस्वीने बनवलेला पदार्थ परीक्षकांना न आवडल्यामुळे तेजस्वी रडू लागली. तेजस्वीने आपल्या डिशची किंमत 2000 रुपये ठेवली होती. मात्र परीक्षक आणि फराह खानने पैसे देण्यास नकार दिला.
Not broken, she’s just rearranging her✴️light #TejasswiPrakash #CelebrityMasterChef pic.twitter.com/dsD223EhTl
— 𝑺𝒉𝒘𝒆𝒕𝒂༊⋆🐾 (@LevelMatchKar) February 10, 2025
‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये तेजस्वीसह दीपिका कक्कड, उषा नाडकर्णी, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, फैजू असे अनेक कलाकार मंडळी आहेत. तर जज म्हणून शेफ विकास खन्ना, शेफ रणवीर ब्रार आणि फराह खान यांचा समावेश आहे. या शोमध्ये अनेक ट्वीस्ट पाहायला मिळत आहे.
सध्या शोमध्ये एक मिस्ट्री बॉक्स दाखवण्यात आला आहे, ज्याची किंमत 31 लाख रुपये आहे. यात ठेवलेल्या वस्तूंची किंमत 11000 रुपयांपासून ते 6.5 लाख रुपयांपर्यंत आहे. अलीकडेच या शोचे पहिले एलिमिनेशन पार पडले आहे. चंदन प्रभाकर हा शोमधून एक्झिट झाला आहे. Tejasswi Prakash |
हेही वाचा:





