Tejashri Pradhan : “मी जोडीदार निवडताना…”; वैयक्तिक आयुष्याबद्दल पहिल्यांदाच बोलली तेजश्री प्रधान

Tejashri Pradhan : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या चांगल्या विषयांवर आधारित चित्रपट येताना दिसत आहेत. सध्या असाच एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान हे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या या चित्रपटाचे नाव ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ असे आहे. आताच्या तरुणांमधील लग्ना संबंधित असलेली चर्चा आणि नपटणारे विचार असा भन्नाट विषय घेऊन तरुणाईला आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ सज्ज झाला आहे. दरम्यान, सिनेमाविषयी बोलताना अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने स्वतःचे लग्नाविषयी असणारे मत आणि काही अनुभव बोलून दाखवले आहेत.
एका मुलाखतीमध्ये तेजश्रीने लग्नाविषयीचं तिचं मत व्यक्त करताना सांगितलं की, “मला तर माझ्या 25तच लग्न करायचं ही, मी केलंही होतं. पण देवाचे काहीतरी वेगळे प्लॅन्स होते. पण माझ्या आताच्या वयातही सगळं छान आहे. आज जर मी जोडीदार निवडण्याचं ठरवलं तर एका वेगळ्या दृष्टीकोनातून मला त्याकडे पाहता येईल.
मी लग्न केलं तेव्हाही माझ्या आईवडिलांनी अजिबात जबरदस्ती केली नाही. मला आयुष्यात लहानपणापासून लग्नच करायचं होतं. मला लग्न करायचं अशाच मूडमध्ये होते मी. मला माझ्या पंचवीशीत लग्न करायचंच होतं. मला होममेकरच व्हायचं होतं. असं ती यावेळी म्हणाली.
दरम्यान, अभिनेत्री तेजश्री ही ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घरांघरांत पोहचली. त्याचवेळी तिने तिचा सहकलाकार शशांक केतकरसोबत आयुष्यभराची गाठही बांधली. पण वर्षभरातच शंशाक-तेजश्रीचा संसार मोडला आणि ते विभक्त झाले. त्यानंतर शशांकने त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेसोबत लग्नगाठ बांधली, तर तेजश्री मात्र अद्यापही सिंगल आहे.
तेजश्री ही सोषसील मीडियावर मोठ्या परमनंट सक्रिय असते, तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती देखील चाहत्यांना देते असते. तेजश्रीच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तेजश्रीला इन्स्टाग्रामवर 1.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.





