Tejashree Pradhan: तेजश्री प्रधानचा नवा ग्लॅमरस लूक चर्चेत; शॉर्ट वनपीसमध्ये वेधलं चाहत्यांचं लक्ष
Tejashree Pradhan तेजश्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे नवे फोटो आणि व्हिडीओ काही मिनिटांतच व्हायरल होतात. यावेळीही तिचा हा मॅजिकल आणि क्यूट अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

Tejashree Pradhan: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेमुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत ती साकारत असलेली स्वानंदीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून तिच्या अभिनयाचंही भरभरून कौतुक होत आहे. अभिनयासोबतच तेजश्री तिच्या स्टायलिश आणि हटके लूकमुळेही नेहमीच चर्चेत असते.

Tejashree Pradhan new haircut look
दरम्यान, तेजश्रीने सोशल मीडियावर तिचे काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा एकदम वेगळा आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. तेजश्रीने गडद लाल रंगाचा स्टायलिश शॉर्ट वनपीस परिधान केला असून तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

Tejashree Pradhan new haircut look
या खास लूकला अधिक आकर्षक बनवण्यासाठी तिने डोळ्यांवर स्टायलिश चष्मा लावला आहे. तसेच हातात जादूची छडी घेतल्यामुळे तिचा अंदाज आणखी हटके दिसत आहे. नव्या हेअरकटसह तेजश्रीचा हा अवतार सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

Tejashree Pradhan new haircut look
मोकळे केस, चेहऱ्यावरील गोड स्मित आणि आत्मविश्वासपूर्ण पोझ यामुळे तिचा हा लूक अधिकच उठून दिसत आहे. चाहत्यांनीही तिच्या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचं आणि स्टाइलचं कौतुक केलं आहे.

Tejashree Pradhan new haircut look
तेजश्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचे नवे फोटो आणि व्हिडीओ काही मिनिटांतच व्हायरल होतात. यावेळीही तिचा हा मॅजिकल आणि क्यूट अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

Tejashree Pradhan new haircut look
सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेसोबतच तेजश्रीचा हा नवा ग्लॅमरस लूकही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.





