Tejas fighter jet crash: दुबई एअर शोमध्ये मोठी दुर्घटना: भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले, वैमानिकाचा जागीच मृत्यू

Tejas fighter jet crash: दुबई एअर शोमध्ये सहभागी झालेले भारतीय हवाई दलाचे (IAF) ‘तेजस’ (Tejas) लढाऊ विमान शुक्रवारी (21 नोव्हेंबर 2025) हवाई कसरतीदरम्यान कोसळले. या अपघातात वैमानिकाचा जागीच मृत्यू झाल्याचे भारतीय हवाई दलाने एका निवेदनात म्हटले आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) निर्मित हे हलके लढाऊ विमान (LCA) दुपारी अंदाजे 2.10 वाजता (स्थानिक वेळेनुसार) एक कसरत करत असताना अचानक खाली कोसळले. या दुःखद घटनेची माहिती देताना भारतीय हवाई दलाने (IAF) म्हटले की, “अपघातात वैमानिकाला जीवघेण्या दुखापती झाल्या असून, भारतीय हवाई दल या जीवनाच्या हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करते आणि दुःखी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”
An IAF Tejas aircraft met with an accident during an aerial display at Dubai Air Show, today. The pilot sustained fatal injuries in the accident.
IAF deeply regrets the loss of life and stands firmly with the bereaved family in this time of grief.
A court of inquiry is being…
— Indian Air Force (@IAF_MCC) November 21, 2025
विमान कोसळल्यानंतर विमानतळावरून मोठ्या प्रमाणात काळा धूर उसळताना दिसला. दुबई सरकारनेही या घटनेला दुजोरा दिला असून, आपत्कालीन पथकांनी त्वरीत प्रतिसाद दिला आणि सध्या ते घटनास्थळी परिस्थिती हाताळत आहेत असे स्पष्ट केले. ‘तेजस’ हे 4.5-जनरेशनचे, सर्व-हवामानासाठी उपयुक्त असलेले लढाऊ विमान आहे. याची लांबी 13.2 मीटर, पंखांचा विस्तार 8.2 मीटर आहे.
VIDEO | Dubai: A Tejas fighter jet taking part in the Dubai Air Show nosedived during an aerial display and crashed this afternoon. The HAL-manufactured aircraft went down around 02:10 pm local time while performing manoeuvres in front of a large audience. An official statement… pic.twitter.com/9MfLJgYeen
— Press Trust of India (@PTI_News) November 21, 2025





