चेन्नईतील थर्मल पावर स्टेशनवर मोठा अपघात, स्टील आर्चर कोसळल्याने 9 मजुरांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

चेन्नई : तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथील एनोर थर्मल पावर स्टेशनच्या बांधकाम स्थळावर मंगळवारी एक भीषण अपघात घडला. स्टेशनच्या बांधकामादरम्यान 30 फूट उंचीवरून स्टील आर्चर कोसळल्याने 9 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुख: व्यक्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, बांधकाम सुरू असताना 30 फूट उंचीवरील स्टील आर्चर अचानक कोसळला आणि त्याखाली अनेक स्थलांतरित मजूर दबले गेले. यात 9 मजुरांचा मृत्यू झाला, तर 10 जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उत्तर चेन्नईतील स्टॅनली गव्हर्नमेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एका मजुराची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Saddened by the mishap due to the collapse of a building in Chennai, Tamil Nadu. My thoughts are with the affected people and their families in this difficult hour. Praying for the speedy recovery of the injured.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next…
— PMO India (@PMOIndia) September 30, 2025
पंतप्रधानांकडून आर्थिक मदतीची घोषणा
या दुर्घटनेबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एक्सवर पोस्ट करत शोक व्यक्त केला. “चेन्नईतील बांधकाम कोसळण्याच्या दुर्घटनेमुळे मी अत्यंत दुखी आहे. या संकटाच्या क्षणी माझ्या संवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल,” असे पीएमओने जाहीर केले.
मृतक मजूर आसाम आणि ओडिशाचे –
तमिळनाडू विद्युत मंडळाचे सचिव आणि तमिळनाडू उत्पादन व वितरण निगमाचे (TANGEDCO) अध्यक्ष डॉ. जे. राधाकृष्णन यांनी सांगितले की, मृत्यू झालेले मजूर आसाम आणि परिसरातील होते. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) चे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सध्या बचाव कार्य आणि तपास युद्धपातळीवर सुरू आहे.
बचाव कार्याला गती –
अपघातानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. अनेक मजूर आर्चरखाली दबले गेले होते, ज्यांना मोठ्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले. घटनास्थळावरून जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. तमिळनाडू प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे बांधकाम स्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





