Mahashakti Teaser: ‘महाशक्ती’ सिनेमाचा टीझर रिलीज; नयनतारा दिसणार शक्तिशाली देवी अवतार
Mahashakti Teaser: ‘महाशक्ती’चा संबंध ‘हनुमान अंश’ या सिनेमाप्रमाणे धार्मिक आणि आध्यात्मिक कथांवर आधारित

Mahashakti Teaser: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री नयनतारा हिच्या ‘महाशक्ती’ या बहुप्रतीक्षित सिनेमाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहे. याचदरम्यान, या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. यातील तिच्या लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नयनताराचा लूक, अभिनयाची झलक आणि सिनेमाची भव्यता पाहता ‘महाशक्ती’ हा सिनेमा मोठ्या पडद्यावर खास ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, नयनताराचा हा अवतार तिच्या याआधीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘महाशक्ती’चा संबंध ‘हनुमान अंश’ या सिनेमाच्या विश्वाशी असल्यामुळे चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. नयनतारा या सिनेमात एका दैवी शक्तीशी जोडलेल्या भूमिकेत दिसणार आहे.
‘हनुमान अंश’ या चित्रपटाने देवभक्ती आणि आस्थेच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता मोठ्या पडद्यावर आणखी एका देवी शक्तीचे आगमन होणार असल्याने अनेकांची उत्सुकता वाढली आहे. ‘महाशक्ती’च्या टीझरमध्ये व्हिज्युअल्स, भव्य सीन्स आणि रहस्याने भरलेल्या जगाची झलक पाहायला मिळते.
पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार
‘महाशक्ती’साठी निर्मात्यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. उत्तर भारतात या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ‘एए फिल्म्स’ सांभाळणार आहे.
‘हनुमान अंश’नंतर आध्यात्मिक चित्रपटांची चर्चा
‘हनुमान अंश’ या चित्रपटानेही आस्था आणि अध्यात्मावर आधारित कथेच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली. आता ‘महाशक्ती’च्या टीझरने पुन्हा एकदा धार्मिक आणि आध्यात्मिक कथांबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. दोन्ही चित्रपटांची कथा आणि पात्रे भिन्न असली, तरी आस्था आणि शक्ती हे दोन्ही चित्रपटांमधील मुख्य घटक आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणारा नयनताराचा ‘महाशक्ती’ प्रेक्षकांवर किती प्रभाव पाडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
हेही वाचा:
Raj Thackeray : “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते…”; राज ठाकरेंचा रोख नेमका कुणाकडे?






