Shraddha Kapoor | अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा चित्रपट स्त्री 2 ची घोषणा दीड वर्षांपूर्वी झाली होती. तर आता या चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. ‘स्त्री 2’ चा टीझर चित्रपट ‘मुंज्या’च्या रिलीज दरम्यान चित्रपटगृहांमध्ये दाखवला जाईल. असे घडले पण ‘स्त्री 2’चा टीझर सोशल मीडियावर लीक झाला आहे. एका युजर्सने चित्रपटगृहातून त्याच्या टीझरचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. ‘स्त्री 2’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लीक झाला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये श्रद्धा कपूरशिवाय आणखी एका अभिनेत्रीची झलकही पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा टीझर अधिकृतपणे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला नाही. ‘स्त्री 2’ चा टीझर सोशल मीडियावर लीक झाला आहे या चित्रपटाचा लीक झालेला टीझर X वर वंडर वर्ल्ड 007 च्या अधिकृत खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘कोण – कोण ‘स्त्री 2′ ची वाट पाहत आहे? हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कारण चाहते जवळपास 5 वर्षांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते’. हा हॉरर कॉमेडी चित्रपट येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी देखील त्याच्या टीझरमध्ये दिसत आहेत. तमन्ना भाटियाही काही दृश्यांमध्ये दिसत आहे. श्रद्धा कपूरचा वेगळा अवतार पाहायला मिळाला आणि राजकुमार राव पुन्हा एकदा विकीच्या भूमिकेत लोकांचे मनोरंजन करणार आहे.