India vs Afghanistan 1st T20 Match Live Cricket Score : आज मोहाली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे.
त्याचबरोबर या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचेही टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. विराट वैयक्तिक कारणांमुळे पहिला सामना खेळत नाहीये. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामन्यास काहीच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (Toss) कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्मानं गोलंदाजीचा निर्णय घेत अफगाणिस्तान संघास प्रथम फलंदाजीसाठी बोलवलं आहे.
1st T20I. India won the toss and elected to field. https://t.co/BkCq71Zm6G #INDvAFG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 11, 2024
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली गुरुवारी होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात वैयक्तिक कारणांमुळे खेळणार नसला तरी 35 वर्षीय विराट कोहली IND vs AFG T20 मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतील पहिला टी-20 सामना 11 जानेवारीला मोहालीत, तर दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. 17 जानेवारी रोजी बेंगळुरूमध्ये तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे.