#TeamIndia : कोहली कसोटी कर्णधार होणार का? निवड समितीचे संकेत…
Updated On:

मुंबई :- भारतीय संघाच्या कसोटी कर्णधारपदी विराट कोहलीची नियुक्ती होणार का, यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका पार पडल्यावर याबाबत निवड समिती विचार करेल, असे संकेत निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले आहेत. मात्र, यावर थेट भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वावर सध्या जोरदार टीका सुरू आहे. मात्र, त्याच्याकडून नेतृत्वाची जबाबदारी कधी काढून घेतली जाईल यावर प्रसाद यांनी मौन बाळगले आहे.
अर्थात वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका पार पडल्यावर पुढील सहा महिने भारतीय संघ कसोटी खेळणार नसल्याने आताच त्यावर बोलणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.





