गावसकर यांच्या टीकेला पुजाराचे संयमी उत्तर, म्हणाला
Updated On:

जोहान्सबर्ग – विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्या टीकेला चेतेश्वर पुजाराने अत्यंत संयमी उत्तर दिले आहे. अजिंक्य रहाणे व पुजारा यांच्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका अखेरची संधी असेल, असे गावसकर म्हणाले होते.
संघ व्यवस्थापनाचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळेच आम्ही खेळावर जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. गावसकर यांनी व्यक्त केलेल्या मतांचा आदर करतो; परंतु येत्या काळात आमच्याकडून मोठी खेळी होईल, असेही पुजाराने सांगितले.





