Azadi ka Amrit Mahotsav : टीम महाराजाची शेष विश्व संघाशी लढत

मुंबई – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त क्रिकेटचा एक अमृतमहोत्सवी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना टीम महाराजा विरुद्ध शेष विश्व यांच्यात येत्या 15 सप्टेंबरला कोलकातातील इडन गार्डन्सवर होणार आहे. या सामन्यात टीम महाराजा संघाचे नेतृत्व भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने असा एक सामना आयोजित करण्याचा प्रस्ताव भारत सरकारने बीसीसीआयला दिला होता व तो लगेचच मान्यही करण्यात आला. या सामन्यात तब्बल 10 देशांचे खेळाडू सहभागी होणार असून या सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी लीजंड्स लीगची सुरुवात होणार आहे.
टीम महाराजा – सौरव गांगुली (कर्णधार), विरेंद्र सेहवाग, महंमद कैफ, ए. बद्रीनाथ, प्रज्ञान ओझा, पार्थिव पटेल, युसूफ पठाण, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, आरपी सिंग, अजय जडेजा, जोगिन्दर शर्मा, रीतिंदर सिंह सोढी आणि इरफान पठान.
शेष विश्व संघ – इयॉन मॉर्गन (कर्णधार), हर्षल गिब्ज, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, लेनली सिमन्स, जॅक कॅलिस, नाथन मॅकलम, जॉटी ऱ्होड्स, मशरफी मोर्तजा, असगर अफगाण, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकाद्जा, ब्रेट ली, केविन ओब्रायन, दिनेश रामदीन, मिचेल जॉन्सन.





