Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही, झाला मोठा निर्णय! जाणून घ्या, तर मग कुठे होणार सामने….

Champions Trophy 2025 (IND vs PAK) : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का दिला आहे. एका रिपोर्टनुसार भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही. टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळू शकते. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे. रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही पाकिस्तानात न जाण्याचे कारण दिले आहे. बीसीसीआयने सुरक्षेचे कारण सांगितले आहे.
इंडियन एक्सप्रेसमधील एका बातमीनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. अलीकडेच बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी चर्चा केली आहे. यामध्ये बीसीसीआयने सुरक्षेचे कारण सांगितले आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळू शकतो. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर नुकतेच पाकिस्तानला गेले होते. यानंतर टीम इंडिया संदर्भात बरीच चर्चा झाली. पण आता पाकिस्तानला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानने भारताला मनवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये आपले सामने खेळल्यानंतर भारतात परतावे, असा प्रस्तावही पीसीबीने दिला होता. या संदर्भात इतर सूचनाही दिल्या. मात्र बीसीसीआयने सुरक्षेचे कारण देत सर्व प्रस्ताव फेटाळले.
पाकिस्तानला मोठा धक्का…
टीम इंडिया पाकिस्तानमध्ये न गेल्याने पीसीबीला मोठा फटका बसणार आहे. यामुळे त्याचे आर्थिक नुकसानही होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानने आपल्या स्टेडियममध्ये बरेच काम केले आहे. त्यांना नव्याने तयार करण्यात आले आहे. यासाठी आयसीसीने निधीही जारी केला होता.
टीम इंडिया ‘या’ ठिकाणी खेळू शकते सामने…
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईत खेळू शकते. यापूर्वी श्रीलंकेबाबतही चर्चा झाली होती. पण बीसीसीआयने दुबईचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जाऊ शकते.





